Sunday, 14 February 2021


विदर्भ साहित्य संघ शाखा वणी व ग्रंथसहवास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
वैदर्भीय समीक्षा विचार परंपरेतील उजळणीवजा चर्चात्मक वाङ्मयीन उपक्रम
-आवर्तन-
डॉ. किशोर सानप यांचा समीक्षा विचार

विदर्भ साहित्य संघ शाखा वणी व ग्रंथसहवास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैदर्भीय समीक्षा विचार परंपरेतील उजळणीवजा चर्चात्मक वाङ्मयीन उपक्रम - आवर्तन- डॉ. किशोर सानप यांचा समीक्षा विचार  या उपक्रमांतर्गत  स्वरूप प्रकाशन, औरंगाबादने सन् 2015 मध्ये प्रकाशित केलेल्या समकालीन समीक्षा  जाणिवा आणि भाष्य  या डॉ. किशोर सानप यांच्या समीक्षा ग्रंथावर नागपूरला विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालयात दि. 20 एप्रिल 2019 शनिवारी चर्चा आयोजित करण्यात आली. वणी विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ. दिलीप अलोणी यांनी डॉ. किशोर सानप यांच्या समीक्षा लेखनाची पार्श्वभूमी विशद केली. समकालीन साहित्याचे अभ्यासक व देशीवादाचे साक्षेपी अभ्यासक व नव्या पिढीचे समीक्षक डॉ. राजेद्र नाईकवाडे यांनी डॉ. सानपांचे समीक्षा लेखन मूल्यनिष्ठ, सर्वसमावेश व नवी प्रमेये सिद्ध करणारे असल्याचे वक्तव्य विस्ताराने मांडले. डॉ. सानप मराठीतील प्रमुख भाष्यकार असून देशीवादावर भाष्य करायचे असेल तर सानपांची समीक्षा टाळून पुढे जाता येत नाही, इतक्या उंचीचे लेखन त्यांनी केले आहे.
डॉ. इंद्रजित ओरके यांनी डॉ. किशोर सानप हे पुरोगामी व बंडखोर लेखक व समीक्षक असूनही समन्वयाची नवी वैचारिक परंपरा त्यांच्या समीक्षेत दिसून येते. तथागत गौतम बुध्द-डॉ. आंबेडकर-महात्मा फुले अशा विचारवंतांचा पुरोगामित्वाचा विचार त्यांच्या समीक्षा लेखनातून दिसून येतो. मराठी साहित्य समीक्षा परंपरेत डॉ. किशोर सानपांची समीक्षा नव्या पिढीला दिशादर्शक व पुढचा मार्ग दाखवणारी असून ते एकूणच समीक्षा परंपरेत आपल्या विविधांगी विषयांच्या ठाम प्रतिपादनातून नवी समकालीन मूल्यपरंपरा मांडतात. पर्यायाने पुरोगामित्वाचाच विचार डॉ. सानप समकालीन वास्तवात पुढे नेतात. संत तुकाराम-भालचंद्र नेमाडे-श्याम मनोहर यांच्यासह अनेक समकालीन पिढीच्याही लेखक-कवींच्या साहित्याची साक्षेपी व मूल्यनिष्ठ समीक्षा त्यांनी केलेली आहे. लेखनाला व्रत मानणारे डॉ. सानप तटस्थपणे आपले लेखन करतात आणि समाजाच्या प्रगतीच्या दिशाही त्यातून सूचित करतात.

आर्वनचे आयोजन व पाहुण्यांचे स्वागत दिलीप म्हैसाळकर यांनी केले तर संचालन माधुरी वाडीभस्मे यांनी केले. तब्बल दीड तास आवर्तन सुरू होते. डॉ. किशोर सानप यांनाही दिलीप म्हैसाळकर यांनी विशेष उपस्थिती म्हणून निमंत्रित केले होते. कार्यक्रमाला वामनराव तेलंग, मानेकर, विवेक गोखले, कविता सानप, अरुंधती वैद्य, प्रकाश एदलाबादकर, अमित गजभिये व जाणकारांची उपस्थिती होती. 


Friday, 26 July 2019

DR SANAP SPEECH -डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशन साहित्य पुरस्कार वितरण समारंभ...







डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशन साहित्य पुरस्कार वितरण समारंभ, नागपूर

डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशन,
नागपूर मार्फत दिनांक 23 जुलै 2019 मंगळवार रोजी सांयकाळी 5.30 वाजता श्रीमंत बाबुराव
धनवटे सभागृह, शंकर नगर नागपूर येथे साहित्य पुरस्कार समारंभ डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशनचे
अध्यक्ष डॉ. श्रीकांत तिडके यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. विजय कुवळेकर, झी 24 तासचे
प्रमुख संपादक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. स्व. मल्हारराव काळे स्मृती समीक्षा पुरस्कार
डॉ. किशोर सानप; स्व. मिरादेवी पिंचा स्मृती पुरस्कार डॉ. सदानंद देशमुख; डॉ. गिरीश
गांधी आंबेडकरी साहित्य पुरस्कार डॉ. भाऊ लोखंडे; पुरुषोत्तम गाडगे स्मृती काव्य पुरस्कार
डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांना डॉ. विजय कुवळेकर यांच्या हस्ते रोख 25000 रूपये व शाल,
श्रीफळ यासह प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. गिरीशभाऊ  गांधी यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ मान्यवरांच्या
हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उत्तम संचालन, परिचय सौ. रेखा दंडिगे-घिया
व गजानन नारे यांनी केले. याप्रसंगी कार्याध्यक्ष श्रीराम काळे व इतरही मान्यवर पदाधिकारी
तसेच नागरिकांची व रसिकांची भरगच्च उपस्थिती होती. याप्रसंगी पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी
आपल्या निर्मितीप्रक्रियेबाबत मनोगते व्यक्त केली. 

डॉ. श्रीकांत तिडके तसेच डॉ.
विजय कुवळेकर यांनी समाज, साहित्य आणि विदर्भाच्या प्रतिभावंतांच्या साहित्यकृतीचे
पदर उलगडून दाखवले. समाजाप्रती लेखकांनी केलेल्या भरीव कामगिरीप्रती पुरस्कार देऊन
समाजानेही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी आयुष्यभर
समाजाच्या प्रबोधनाचे कार्य केले त्यामुळेच डॉ. गिरीशभाऊंसारख्या कृतज्ञ व्यक्तिमत्त्वाने
कृतज्ञता सोहळा आयोजित करून आपले सामाजिक व सांस्कृतिक उत्तरदायित्वही पार पाडल्याची
भावना डॉ. कुवळेकरांनी व्यक्त केली.

समीक्षक किंवा टीकाकारही सृजनशील लेखक असतो

डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशनतर्फे
डॉ. गिरीश गांधी यांनी पुरस्कृत केलेल्या स्व. मल्हारराव काळे समीक्षा पुरस्काराला
उत्तर देताना काही मौलिक प्रमेये सृजनशील साहित्य व समीक्षालेखनाचा एकास एक अनुबंध
असल्याचे तत्त्व मानताना व्यक्त केली आहेत. समीक्षा व टीका ही परजीवी मानण्याचा प्रघात
असल्याचे आजवर दिग्गज समीक्षकांनीही मानलेले आहे. डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी सुद्धा
समीक्षा किंवा टीका परजीवी असल्याचे मान्य केले. माझे मत यापेक्षा वेगळे आहे.  समीक्षा किंवा टीका ही परजीवी नसून ती सुद्धा साहित्यकृती-कलाकृतीचे
नावीण्याचे नवेनवे पदर उलगडुन दाखवताना सृजनशीलच असते. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी
व रवीन्द्रनाथ टागोरांची गितांजली हे टीका किंवा भाष्यकाव्य असून ती सृजनशील समीक्षाच
आहे. कथा-कादंबरी-कवितेइतकीच समीक्षा किंवा टीकाही सृजनशील असते. मी स्वतः कवी-कथाकार-कादंबरीकार
असून सृजनशील साहित्याचाच निर्माता आहे. पुढे समीक्षेत माझी ओळख समग्र तुकाराम दर्शन
व समग्र नेमाडे यांच्यावरील ग्रंथांमुळे झाली. समीक्षा, संतसाहित्यावरील विवेकवादी
भाष्य आदींमुळे सांस्कृतिकविश्वाने समीक्षक म्हणून शिक्कामोर्तब केला. खरेतर माझ्यातील
सृजनशील लेखक  सर्व वाङ्मय प्रकारात ग्रंथनिर्मिती
करीत असल्याने, माझी समीक्षाही सृजनशील समीक्षाच असते. लेखनाची काही प्रमेय मी मानतो.
1.    कविता-कथा-कादंबरीप्रमाणेच समीक्षाही सृजनशीलच असते. ती परजीवी असूच
शकत नाही. समीक्षक हा सुद्धा समीक्षेची नवीन सृजनशील कलाकृती निर्माण करीत असतो. निदान
मी तरी तसे मानतो आणि अनुभवतोही. साहित्यकृतीपेक्षा समीक्षाकृती ही भिन्न व स्वतंत्र
असते. केवळ साहित्यकृतीवर समीक्षा जगते हा एक मोठा भ्रम आहे आणि तो मराठी सांस्कृतिकविश्वातच
रुढ आहे.
2.    लेखक हा नैतिक व प्रतिभावंत असतो. 
त्याचा स्वतःचा मूल्यविचार तो आपल्या साहित्यकृतीतून मांडत असतो. कधी तो पात्रांच्या
माध्यमाने तर कधी समीक्षेच्या माध्यमाने.
3.    लेखकाची स्वतःची नैतिकता असते. तिचाच आविष्कार साहित्यकृतीतून तो करीत
असतो. सन्मानहौसेत बुडालेले लेखक वरवर कितीही नैतिक व समकालीन असल्याचे भासवत असले
तरी त्यांची न-नैतिकता ओळखणारा काळ हा सर्वात मोठा रसिक असतो.
4.    लेखक हा स्वांतःसुखाय कधीच लिहित नाही. समाजप्रबोधनाचे व्रत व सांस्कृतिक
संवर्धनाचे उत्तरदायित्व त्याला पार पाडावे लागते. सर्वहारा शेवटच्या माणसाला हिंमत
देण्यासाठी तो त्याच्यासोबत उभा असतो.
5.    समीक्षक किंवा टीकाकारही सृजनशील लेखक असतो. हे माझे स्वतःच्या अनुभवाने
सिद्ध झालेले प्रमेय आहे.

Friday, 26 April 2019

DR. SANAP SPEECH-GOMANTAK MARATHI SEVAK MANDAL, PANJI









DR. SANAP SPEECH-GOMANTAK MARATHI SEVAK MANDAL, PANJI

गोमंतक मराठी सेवक मंडख, पणजी-गोवा डॉ. किशोर सानप यांचे मी व माझे
लेखन याविषयावर व्याख्यान 8 नोव्हेंबर 2017
भाषेच्या जाणिवा समृद्ध करणारे लेखन आजवर केले आहे-डॉ. किशोर सानप

गोमंतक मराठी सेवक मंडख, पणजी-गोवा
डॉ. किशोर सानप यांचे मी व माझे लेखन याविषयावर व्याख्यान झाले. शंभू बांदेकर व मंडळाध्यक्ष
रमेश वासकर यांच्या उपस्थितीत संपन्न  झाले.
कवयित्री चित्रा पांढरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कवी प्रकाश क्षिरसागर,
सुरेश नाईक, सुप्रसिद्ध लेखक सुहास बेळेकर व गोव्यातील मराठी लेखक, कवी, पत्रकार यांची
उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर वाचकांनी आपले प्रश्नही डॉ. सानप यांना विचारले.

SURYANSH CHANDRAPUR DR SANAP BHASHAN PART III- 23 JULY 2017





सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळा दि. 23 जुलै 2017
Ø  सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळा दि. 23 जुलै 2017 … डॉ. किशोर सानप यांचे भाषण-3

      सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळा दि. 23 जुलै 2017 रोजी डॉ. किशोर सानप यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाध्यक्ष कविवर्य व सर्वधाराचे संपादक सुखदेव ढाणके व प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण टाके, प्राचार्य राजेश इंगोले, आनंद लोकरे, प्रदिप देशमुख, शिवाजी चाळक आणि कवयित्री पद्मरेखा धनकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात राज्यातील विविध वाङ्मय प्रकारात लिहिणार्‍या उमेदीच्या लेखकांना, शिरःस्नाताच्या कवयित्री सारिका उबाळे परळकर, सदानंद पुंडपाळ, सुनील विभुते, ईश्वर नंदपुरे, विमलताई गाडेकर, सदानंद बोरकर, मंगेश जनबंधू, संदिप वाघाले यांना पुरस्कृत करण्यात आले. कवी इरफान शेख या उमेदीच्या व नव्या पिढीच्या सशक्त कवीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अनेक पत्रकार व नागरिक रसिकांची उपस्थिती कार्यक्रमात होती. सूत्रसंचालन नरेशकुमार बोरीकर यांनी केले होते.


SURYANSH CHANDRAPUR DR SANAP BHASHAN PART II- 23 JULY 2017





सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळा दि. 23 जुलै 2017
Ø  सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळा दि. 23 जुलै 2017 … डॉ. किशोर सानप यांचे भाषण-2

      सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळा दि. 23 जुलै 2017 रोजी डॉ. किशोर सानप यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाध्यक्ष कविवर्य व सर्वधाराचे संपादक सुखदेव ढाणके व प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण टाके, प्राचार्य राजेश इंगोले, आनंद लोकरे, प्रदिप देशमुख, शिवाजी चाळक आणि कवयित्री पद्मरेखा धनकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात राज्यातील विविध वाङ्मय प्रकारात लिहिणार्‍या उमेदीच्या लेखकांना, शिरःस्नाताच्या कवयित्री सारिका उबाळे परळकर, सदानंद पुंडपाळ, सुनील विभुते, ईश्वर नंदपुरे, विमलताई गाडेकर, सदानंद बोरकर, मंगेश जनबंधू, संदिप वाघाले यांना पुरस्कृत करण्यात आले. कवी इरफान शेख या उमेदीच्या व नव्या पिढीच्या सशक्त कवीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अनेक पत्रकार व नागरिक रसिकांची उपस्थिती कार्यक्रमात होती. सूत्रसंचालन नरेशकुमार बोरीकर यांनी केले होते.


SURYANSH CHANDRAPUR DR SANAP BHASHAN PART I- 23 JULY 2017







सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर राज्यस्तरीय वाङ्मय
पुरस्कार प्रदान सोहळा दि. 23 जुलै 2017
Ø  सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर राज्यस्तरीय वाङ्मय
पुरस्कार प्रदान सोहळा दि. 23 जुलै 2017 … डॉ. किशोर सानप यांचे भाषण-1

      सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार
प्रदान सोहळा दि. 23 जुलै 2017 रोजी डॉ. किशोर सानप यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाध्यक्ष
कविवर्य व सर्वधाराचे संपादक सुखदेव ढाणके व प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण टाके, प्राचार्य
राजेश इंगोले, आनंद लोकरे, प्रदिप देशमुख, शिवाजी चाळक आणि कवयित्री पद्मरेखा धनकर
यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात राज्यातील विविध वाङ्मय प्रकारात
लिहिणार्‍या उमेदीच्या लेखकांना, शिरःस्नाताच्या कवयित्री सारिका उबाळे परळकर, सदानंद
पुंडपाळ, सुनील विभुते, ईश्वर नंदपुरे, विमलताई गाडेकर, सदानंद बोरकर, मंगेश जनबंधू,
संदिप वाघाले यांना पुरस्कृत करण्यात आले. कवी इरफान शेख या उमेदीच्या व नव्या पिढीच्या
सशक्त कवीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अनेक पत्रकार व नागरिक रसिकांची उपस्थिती
कार्यक्रमात होती. सूत्रसंचालन नरेशकुमार बोरीकर यांनी केले होते.