डॉ.किशोर सानप : साहित्याव्रती,२०१५
मातोश्री
सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे चारिटेबल ट्रस्ट, अमरावती तर्फे दि.१२जानेवारी २०१५ रोजी मा. ना. प्रवीण पोटे, राज्यमंत्री आणि पालकमंत्री अमरावती; श्री दिलीपजी निभोरकर,
प्राचार्य डॉ.वाकडे आणि मा.रामचंद्रजी पोटे, अध्यक्ष, मातोश्री सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे
चारिटेबल ट्रस्ट,
अमरावती याच्या उपस्थितीत कवी नारायण सुमंत आणि
प्रा.कुमार बोबडे,
मातोश्री सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे
चारिटेबल ट्रस्ट,
पुरस्कार समितीच्या संयोजिका डॉ.शोभा रोकडे
आणि शिक्षक,
विध्यार्थी, कवी, लेखक आदींच्या उपस्थितीत डॉ.किशोर सानप
यांना सन्मानपूर्वक मराठी साहित्यातील आजवरच्या योगदाना बद्धल जीवन गौरव म्हणून साहित्याव्रती, २०१५ पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ,
सन्मान चिन्ह व सन्मान पत्र आणि रोख राशी ११,०००/-असे या प्रस्काराचे स्वरूप होते.
याच कार्यक्रमात
कविता,कथा, ललित,
कादंबरी आणि इतरही वाड्मय प्रकाराकरिता
राज्यभरातून निवडलेल्या उत्तम साहित्य कृतीना आणि लेखकानाही पुरस्कृत करण्यात आले.डॉ.किशोर सानप यांनी त्यांच्या वाड्मयीन निर्मितीवर भाष्य
केल्यावर कवी नारायण सुमंत यांचें काव्यगायन झाले.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.