संत ज्ञानेश्वरपूर्वकाळात आद्यभक्त पुंडलिकाने विठ्ठलाची मूर्ती
पंढरपुरी चंद्रभागा-भीमेच्या तिरी स्थापन केली. भक्त पुंडलिक भागवत धर्माचा
संस्थापक मानला जातो. पुंडलिकाविषयी संत ज्ञानेश्वर म्हणतात , ' पुंडलिके भक्ते तारिले विश्वजना।
वैकुंठीची मूर्ती आणिली पंढरपूर पाटणा।। काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार। बाप
रखुमादेवीवरा विठ्ठलाचा वारीकर।। '
पुंडलिकानं विश्वजनाला विठ्ठलोपासनेचा भक्तिमार्ग दाखवून , सर्वात्मक सर्वेश्वराचं दर्शन
घडवलं. भक्त पुंडलिकापासून अस्तित्वात आलेला संतांचा भक्तिसंप्रदाय म्हणजे
सर्वधर्मसमभाव , सदाचार , बंधूभाव , दया , क्षमा , शांती , करुणेचा मानवतावादी संस्कार
जगातल्या लोकांवर करणारा संतसज्जनांचा जीवनमार्ग होय.
विठ्ठलभक्तांची
चंद्रभागेच्या वाळवंटी मांदियाळी ,
भजन , कीर्तन , टाळमृदंगांच्या साथीनं ' समचरणदृष्टी विटेवरी साजिरी। तेथे
माझी हरी वृत्ति राहो।। ' असा
भक्तिप्रेमभाव अंगी दाटून ,
चित्ती आनंदानं डोलून ,
गर्जती विठ्ठले नामघोष करून ,
गुढिया रोमांकुरे सात्त्विकी दाटून , हरिरंगी नाचणाऱ्यांची चरणधूळ मस्तकी
लावण्याची आणि ' क्रोध अभिमान
केला पावटणी। एक एका लागतीलय पायीं रे।। ' ही परंपराच आहे. आजही
आषाढी-कार्तिकी एकादशीला १०-२० लाख भक्त पंढरपूरच्या वाळवंटी विठ्ठलाचं सुंदर ते
ध्यान पाहण्यासाठी जगभरातून येतात.
' विष्णुमय जग। वैष्णवांचा धर्म।
भेदाभेद भ्रम। अमंगळ। ' मानणारा
हा वैष्णव मार्ग आहे. विठ्ठलाच्या भक्तीची पारलौकिक कल्याणाची पेठ , संतांनी मावजातीसाठी खुली करून
ठेवली आहे. ' सकळांशी येथे आहे
अधिकार। कलियुगी उद्धार हरिच्या नामे।। ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , शुद्र।। चांडाळाही अधिकार।। बाळे
, नारी , नर। आदिकरूनी वेश्याही।। ' सर्वच जातीधर्मपंथसंप्रदायातल्या
आबालवृद्ध स्त्री-पुरुषांना विशेषत: सर्वच धर्म-भक्तीमार्गांनी ज्यांना नाकारलं
, त्या शुद्र , चांडाळ , नारी-वेश्यांनाही संतांनी हृदयाशी
कवटाळून , भक्तीचं पसायदान
वाटलं. विठ्ठलाची भक्ती करून भक्त-भागवत अद्वैतानुभव घेण्याचा सर्वांनाच समानाधिकार
दिला. पारलौकिक मुक्ती-मोक्ष प्राप्त करण्याचा अधिकार मान्य करणारा भागवत धर्म
पुंडलिकानं स्थापन केला. संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्म व विठ्ठलाचा भक्ति-मार्ग
जनसामान्यांस मोकळा केला. भगवद्गीतेवर मराठी भाषेतून भाष्य करणारी ज्ञानेश्वरी
लिहिली. आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची पायाभूत मांडणी केली. ' नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू
जगी।। ', हेच जनजागरणाचं कार्य
हजार वर्षांच्या परंपरेत , संत
ज्ञानदेव , नामदेव , एकनाथ , तुकाराम यांनी केलं.
- डॉ. किशोर सानप
Maharashtra Times 29 may 2012
|
सकळांशी
येथे आहे अधिकार... 29 May 2012, 0140 hrs IST

तिर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी
5 Jun 2012, 0121 hrs IST
|
|
|
- डॉ. किशोर सानप
पावसाची चाहूल. पेर्तेव्हाऽऽऽ पेर्तेव्हाऽऽऽ ऐकण्यासाठी भूमिपुत्र बळीराजा
उत्सुक. पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाचे वेध लागण्याची घटिका. माय
पांढरीच्या सृजनाचा उत्कट काळ. पेरणीची हातघाई. देशभरातून वारकऱ्यांच्या
वाऱ्या-दिंड्या पंढरपूरच्या वाटेनं निघालेल्या. सुंदर ध्यानाच्या नादानं
गावागावातून चंद्रभागा-भीमातीरी वसलेल्या पंढरपूरच्या दिशेनं वारकऱ्यांच्या
दिंड्या आगेकूच करीत आहेत. ' बोलावा विठ्ठल , करावा विठ्ठल , भजावा विठ्ठल , पहावा विठ्ठल जीवभावे ;' याच हरिवृत्तीनं भक्त-भागवत होण्यासाठी संसाराचे भवपाश सोडून घराबाहेर पडलेले.
काहीच नको असतं भक्तजनांना. कशाचीच आस नाही. आणिक न लगे मायिक पदार्थ आणि ब्रह्मादिक पदे दु:खाची शिराणी मानून , तुकोबा म्हणतात तसे , ' तुका म्हणे त्याचे कळले आम्हां वर्म। जे जे कर्मधर्म नाशवंत॥ ' विठ्ठलाचे भक्त ज्ञानी असतात. जीवनाचं अध्यात्म त्यांना कळलेलं असतं. संसार त्यांनी जिंकलेला असतो. तुझे पायी सर्व सुख आहे म्हणून , ' गोड तुझे रूप गोड तुझे नाम। देई मज प्रेम सर्वकाळ ' याची खात्री असते. पंढरीचा महिमाच थोर. ' ऐसा ठाव नाहीच कोठे , जिथे देव उभाउभी भेटे. ' बाकी तर , ' तिर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनी. तुका म्हणे पेठ। भूमिवरी हे वैकुंठ॥ '
पंढरपूर ही भक्तांसाठी सर्वोच्च जागतिक भक्ती-पेठ आहे. भुवैकूंठच आहे.
जनसामान्यांच्या पारलौकिक कल्याणाचं हे सर्वात मोठं केंद्र आहे.
अनेकांना वाटतं की , आषाढी एकादशीला पंढरपुरात लाख्खो लोक देशविदेशातून येतात तरी कशासाठी ? एवढ्याशा पंढरपुरात हे लोक राहतात तरी कसे ? लोकांचे हाल होतात. तरी लोक दरवर्षी जमतात तरी कसे ?
असे अनेक कुतूहल निर्माण करणारे प्रश्न आजचेच नाहीत. अनेक वर्षांपासून
जिज्ञासूंच्या मनात निर्माण होतात. प्रश्न विचारणाऱ्यापेक्षा प्रश्न
भोगणाऱ्या लोकांना त्याचं कधीच काही वाटत नाही. कारण , वारकरी-भक्तजन विठ्ठलाचे वीर असतात. ' आम्ही विठ्ठलाचे वीर , फोडू कळीकाळाचेही शीर... ' असे हे निर्भयपणे संकटांवर मात करणारे वारीकर. पंढरपूर- विठ्ठल- वारी- भक्ती- आषाढी- कार्तिकी- भजन- कीर्तन- टाळमृदंगांच्या तालावर ' जयजय रामकृष्ण हरिऽऽ पुंडलिक वरदेऽऽ हरि विठ्ठलऽऽ ज्ञानदेवऽऽ तुकाऽऽराम... ' गजरात आमचे वारीकर संसाराच्या चिंता विसरून , मुक्ती मोक्ष प्राप्तीचा अलौकिक आनंद , याचि जगी याचि देही याचि डोळा साक्षात अनुभवतात. आनंदाचे डोही आनंद तरंग , आनंदचि अंग आनंदाचे करून ,
सावळ्या परब्रह्माच्या दर्शनानं पावन होतात. हे सर्व गेल्या हजार
वर्षांपासून तरी महाराष्ट्रातल्या पंढरपुरात आषाढी-कार्तिकी एकादशीला घडत
आलं आहे...
Maharashtra Times 5 june 2012
|
|
|
|
|
|
|
|
|
|
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.