Thursday, 8 March 2012

शब्द- किशोर सानप

sanskrutik kalnirnay, dipavli, 2011-shabda... by Kishor Sanap on Tuesday, November 29, 2011 at 11:40pm · शब्द शब्द : शब्दांना जन्म देणारे माणसाला फसविणारे शब्द : वाळ्वंटातल्या वादळासारखे माणसाला होरपळत ठेवणारे शब्द : आसवांना वाहून नेणारे डोळ्यांचे काठ भिजवणारे शब्द : दु:खाची पोकळी निर्माण करणारे माणसाला सरणावर ठेवणारे शब्द : जीवनाला फुलविणारे माणसाला मालविणारे शब्द : माणसाला अमानुष करणारे हृदयाला भेदून जाणारे शब्द : माणसांचे माणसांच्या मनांचे मनालाच उध्वस्त करणारे शब्द : शब्दांचे महाल रचणारे महालांचे कडे खचविणारे शब्द : शब्दांचे नेते शब्दांनाच भुलणारे शब्द : निवडणुकीच्या जाहीरनाम्यातले तुमचे आमचे गळे कापणारे शब्द : मूकपणा स्वीकारणारे माणसांचे गुलाम असणारे.... - किशोर सानप ( सांस्कृतिक कालनिर्णय , दीपावली , २०११ च्या अंकातील हि कविता १९८० च्या आसपास केव्हातरी अकोला येथे शिवाजी कॉलेजात शिकत असताना लिहिली होती. १९८५ ला ऋतू कविता संग्रह प्रकाशित झाला त्यात ही कविता आहे. तेव्हा नारायण कुलकर्णी कवठेकर , वसंत वाहोकार, पुरुषोत्तम बोरकर , श्रीकृष्ण राऊत, हे दिग्गज कवी अकोल्यातल्या कविता विश्वाचं भूषण होतं. आज मराठी कवितेचं भूषण आहेत. मी ही तेव्हा कविता लिहित होतो. आता कथा-कादंबरी-समीक्षा अश्या गद्य विश्वात वावरतो. महेश केळुस्कर या कवी मित्राने पुन्हा मनातल्या कवितेला जिवंत केलं. आता कवितेला मी रोज घरात पाहतो. कविता आता मनात कायमची घर करून बसली. कथा-कादंबरी-समीक्षा अश्या गद्य सवतीशी लेखन संसार सुरु आहे.) Like · · Unfollow Post · Share · Delete

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.