Thursday, 25 April 2019

DR SANAP SPEECH II JANSAHITYA SAMMELAN AMRAVATI 26 MARCH 2016







Ø  डॉ. किशोर सानप यांचे प्रमुख अतिथी म्हणून केलेले जनसाहित्य संमेलनातील
व्याख्यान-2

      14 वे जनसाहित्य संमेलन अमरावती, 26 मार्च 2016 रोजी डॉ. निळकंठ गोपाळ
मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. जनसारस्वर सुदाम सावरकर नगरीत संपन्न संमेलनाचे
स्वागताध्यक्ष मा. आनंदराव अडसुळ, जनसाहित्य चळवळीचे उर्ध्वयू डॉ. सुभाष सावरकर तसेच
प्रमुख पाहुणे डॉ. विलास सपकाळ, कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. किशोर
सानप, कवी वाहरू सोनवणे व डॉ. शंकर बुंदुले उपस्थित होते.

      तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोली या आदिवासी
भागात दि. 25 फेब्रुवारी 2016  रोजी सुप्रसिद्ध
शेतकरी साहित्याचे भाष्यकार, संघटक, शेतकरी नेते, कादंबरीकार डॉ. शेषराव मोहिते यांच्या
अध्यक्षतेखाली संपन्न झाले. डॉ. अभय बंग यांनी संमेलनाचे उद्घाटन केले तर प्रमुख अतिथी
म्हणून डॉ. किशोर सानप तर स्वागताध्यक्ष श्री शालिक पाटील नाकाडे होते. संमेलनात शेतकर्‍यांच्या
आजच्या वर्तमान समस्यांचा वास्तविक वेध सर्वच वक्त्यांनी घेतला. शेतकरी साहित्याचे
प्रवर्तक व शेतकरी साहित्याचे भाष्यकार व शेतकरी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर
मुटे यांच्या गझल माझी निराळी या गझल काव्यसंग्रहाच्या तिसर्‍या आवृत्तीला डॉ. किशोर
सानप यांनी प्रस्तावना दिली व संमेलनात तिसर्‍या आवृत्तीचे व ई-आवृत्तीचेही प्रकाशन
प्रमुखांच्या उपस्थितीत पार पडले.


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.