Thursday, 26 January 2012

दलित स्त्री आत्मकथने आणि कलाजीवन तिच्या अन्तस्थाच

दलित स्त्री आत्मकथने आणि कलाजीवन तिच्या अन्तस्थाच
दलित स्त्री आत्मकथने आणि कलाजीवन तिच्या अन्तस्थाच ही दोन सुबक आणि आकर्षक पुस्तके नुकतीच प्रकाशित झाली आहेत.
श्यामल गरुड या नव्या विलक्षण आणि जाणकार स्त्रीने लिहिलेली आहेत.
समीक्षेच्या पारंपारिक क्षेत्रात बहुदा हे पहिलेच परंतु भारदस्त हत्ती पाऊल आहे.
जो पर्यंत अशी हत्ती पाऊले पडत नाहीत तो पर्यंत मराठी समीक्षेची झोपही उघडत नाही.
दलित स्त्री आत्मकथने आणि कलाजीवन तिच्या अन्तस्थाच ही दोन्ही आत्मकथने विशेषत: दलित आणि दलितेतर स्त्रियांच्या सोशिक जीवन कहाण्या आहेत.
स्त्री कोणतीही असो ती पुरुषप्रधान समाजात दलित आणि शोषितच जीवन जगत असते.
शांताबाई कांबळे असो कि शांताबाई हुबळीकर असो स्त्रीजन्माच्या त्यांच्या चित्तरकथाच असतात.
मराठीतल्या सांस्कृतिक स्त्रीत्वाचे आणि पारंपारिक स्त्री शोषणाचे सर्वांगीण चित्रण आणि मूल्यमापन
श्यामल गरुड या नव्या विलक्षण आणि जाणकार स्त्रीने मराठी समीक्षेच्या पारंपारिक क्षेत्रात करून
भारदस्त पाऊल टाकल्यामुळे मराठी समीक्षेच्या पारंपारिक क्षेत्रात या निमित्ताने
एक स्त्रियांच्या समीक्षा लेखनाचा जबरदस्त दबाव गट निर्माण होत असल्याची ही सुचिन्हे आहेत.
दलित स्त्री आत्मकथने आणि कलाजीवन तिच्या अन्तस्थाच ही दोन आत्मकथने श्यामल गरुड
या नव्या विलक्षण आणि जाणकार नवतरुणी सामिक्षिकेने लिहिल्याबद्दल
मनपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या धाडसी समीक्षा लेखनासाठी
शुभेछ्यासह....
डॉ. किशोर सानप

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.