सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळा दि. 23 जुलै 2017
Ø सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळा दि. 23 जुलै 2017 … डॉ. किशोर सानप यांचे भाषण-2
सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळा दि. 23 जुलै 2017 रोजी डॉ. किशोर सानप यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाध्यक्ष कविवर्य व सर्वधाराचे संपादक सुखदेव ढाणके व प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण टाके, प्राचार्य राजेश इंगोले, आनंद लोकरे, प्रदिप देशमुख, शिवाजी चाळक आणि कवयित्री पद्मरेखा धनकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात राज्यातील विविध वाङ्मय प्रकारात लिहिणार्या उमेदीच्या लेखकांना, शिरःस्नाताच्या कवयित्री सारिका उबाळे परळकर, सदानंद पुंडपाळ, सुनील विभुते, ईश्वर नंदपुरे, विमलताई गाडेकर, सदानंद बोरकर, मंगेश जनबंधू, संदिप वाघाले यांना पुरस्कृत करण्यात आले. कवी इरफान शेख या उमेदीच्या व नव्या पिढीच्या सशक्त कवीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अनेक पत्रकार व नागरिक रसिकांची उपस्थिती कार्यक्रमात होती. सूत्रसंचालन नरेशकुमार बोरीकर यांनी केले होते.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.