Monday, 4 June 2012

MAZE ADHYATMA SADAR MAHARARSHTRA TIMES DAR MANGALWARI

MITRANO,

MAHARASHTRA TIMES MADHE 29-5-12 PASUN MAZE ADHYTMA DEOGHAR-SAGUNNIRGUN-AK SADAR SURU ZALE AHE. DAR MANGALWARLA APLYALA mATA MADUN WACHTA YEYIL.

YA SADRATUN WARKARI SAINT-SANTANCHE JIVAN ADHYTMA-WARKARI CULTURE ADI BABI SANGNYACHA PRAYATNA RAHIL.

APLA

DR. KISHOR SANAP

सकळांशी येथे आहे अधिकार...
29 May 2012, 0140 hrs IST
 
 प्रिंट  मेल  शेअर
 सेव  प्रतिक्रिया फॉन्ट:

संत ज्ञानेश्वरपूर्वकाळात आद्यभक्त पुंडलिकाने विठ्ठलाची मूर्ती पंढरपुरी चंद्रभागा-भीमेच्या तिरी स्थापन केली. भक्त पुंडलिक भागवत धर्माचा संस्थापक मानला जातो. पुंडलिकाविषयी संत ज्ञानेश्वर म्हणतात , ' पुंडलिके भक्ते तारिले विश्वजना। वैकुंठीची मूर्ती आणिली पंढरपूर पाटणा।। काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार। बाप रखुमादेवीवरा विठ्ठलाचा वारीकर।। ' पुंडलिकानं विश्वजनाला विठ्ठलोपासनेचा भक्तिमार्ग दाखवून , सर्वात्मक सर्वेश्वराचं दर्शन घडवलं. भक्त पुंडलिकापासून अस्तित्वात आलेला संतांचा भक्तिसंप्रदाय म्हणजे सर्वधर्मसमभाव , सदाचार , बंधूभाव , दया , क्षमा , शांती , करुणेचा मानवतावादी संस्कार जगातल्या लोकांवर करणारा संतसज्जनांचा जीवनमार्ग होय.
विठ्ठलभक्तांची चंद्रभागेच्या वाळवंटी मांदियाळी , भजन , कीर्तन , टाळमृदंगांच्या साथीनं ' समचरणदृष्टी विटेवरी साजिरी। तेथे माझी हरी वृत्ति राहो।। ' असा भक्तिप्रेमभाव अंगी दाटून , चित्ती आनंदानं डोलून , गर्जती विठ्ठले नामघोष करून , गुढिया रोमांकुरे सात्त्विकी दाटून , हरिरंगी नाचणाऱ्यांची चरणधूळ मस्तकी लावण्याची आणि ' क्रोध अभिमान केला पावटणी। एक एका लागतीलय पायीं रे।। ' ही परंपराच आहे. आजही आषाढी-कार्तिकी एकादशीला १०-२० लाख भक्त पंढरपूरच्या वाळवंटी विठ्ठलाचं सुंदर ते ध्यान पाहण्यासाठी जगभरातून येतात.
' विष्णुमय जग। वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम। अमंगळ। ' मानणारा हा वैष्णव मार्ग आहे. विठ्ठलाच्या भक्तीची पारलौकिक कल्याणाची पेठ , संतांनी मावजातीसाठी खुली करून ठेवली आहे. ' सकळांशी येथे आहे अधिकार। कलियुगी उद्धार हरिच्या नामे।। ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , शुद्र।। चांडाळाही अधिकार।। बाळे , नारी , नर। आदिकरूनी वेश्याही।। ' सर्वच जातीधर्मपंथसंप्रदायातल्या आबालवृद्ध स्त्री-पुरुषांना विशेषत: सर्वच धर्म-भक्तीमार्गांनी ज्यांना नाकारलं , त्या शुद्र , चांडाळ , नारी-वेश्यांनाही संतांनी हृदयाशी कवटाळून , भक्तीचं पसायदान वाटलं. विठ्ठलाची भक्ती करून भक्त-भागवत अद्वैतानुभव घेण्याचा सर्वांनाच समानाधिकार दिला. पारलौकिक मुक्ती-मोक्ष प्राप्त करण्याचा अधिकार मान्य करणारा भागवत धर्म पुंडलिकानं स्थापन केला. संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्म व विठ्ठलाचा भक्ति-मार्ग जनसामान्यांस मोकळा केला. भगवद्गीतेवर मराठी भाषेतून भाष्य करणारी ज्ञानेश्वरी लिहिली. आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची पायाभूत मांडणी केली. ' नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।। ', हेच जनजागरणाचं कार्य हजार वर्षांच्या परंपरेत , संत ज्ञानदेव , नामदेव , एकनाथ , तुकाराम यांनी केलं.
- डॉ. किशोर सानप 
Maharashtra Times 29 may 2012

तिर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी
5 Jun 2012, 0121 hrs IST

 प्रिंट मेल शेअर
 सेव प्रतिक्रियाफॉन्ट:

- डॉ. किशोर सानप
पावसाची चाहूल. पेर्तेव्हाऽऽऽ पेर्तेव्हाऽऽऽ ऐकण्यासाठी भूमिपुत्र बळीराजा उत्सुक. पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाचे वेध लागण्याची घटिका. माय पांढरीच्या सृजनाचा उत्कट काळ. पेरणीची हातघाई. देशभरातून वारकऱ्यांच्या वाऱ्या-दिंड्या पंढरपूरच्या वाटेनं निघालेल्या. सुंदर ध्यानाच्या नादानं गावागावातून चंद्रभागा-भीमातीरी वसलेल्या पंढरपूरच्या दिशेनं वारकऱ्यांच्या दिंड्या आगेकूच करीत आहेत. ' बोलावा विठ्ठल , करावा विठ्ठल , भजावा विठ्ठल , पहावा विठ्ठल जीवभावे ;' याच हरिवृत्तीनं भक्त-भागवत होण्यासाठी संसाराचे भवपाश सोडून घराबाहेर पडलेले.
काहीच नको असतं भक्तजनांना. कशाचीच आस नाही. आणिक न लगे मायिक पदार्थ आणि ब्रह्मादिक पदे दु:खाची शिराणी मानून , तुकोबा म्हणतात तसे , ' तुका म्हणे त्याचे कळले आम्हां वर्म। जे जे कर्मधर्म नाशवंत॥ ' विठ्ठलाचे भक्त ज्ञानी असतात. जीवनाचं अध्यात्म त्यांना कळलेलं असतं. संसार त्यांनी जिंकलेला असतो. तुझे पायी सर्व सुख आहे म्हणून , ' गोड तुझे रूप गोड तुझे नाम। देई मज प्रेम सर्वकाळ ' याची खात्री असते. पंढरीचा महिमाच थोर. ' ऐसा ठाव नाहीच कोठे , जिथे देव उभाउभी भेटे. ' बाकी तर , ' तिर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनी. तुका म्हणे पेठ। भूमिवरी हे वैकुंठ॥ ' पंढरपूर ही भक्तांसाठी सर्वोच्च जागतिक भक्ती-पेठ आहे. भुवैकूंठच आहे. जनसामान्यांच्या पारलौकिक कल्याणाचं हे सर्वात मोठं केंद्र आहे.
अनेकांना वाटतं की , आषाढी एकादशीला पंढरपुरात लाख्खो लोक देशविदेशातून येतात तरी कशासाठी ? एवढ्याशा पंढरपुरात हे लोक राहतात तरी कसे ? लोकांचे हाल होतात. तरी लोक दरवर्षी जमतात तरी कसे ? असे अनेक कुतूहल निर्माण करणारे प्रश्न आजचेच नाहीत. अनेक वर्षांपासून जिज्ञासूंच्या मनात निर्माण होतात. प्रश्न विचारणाऱ्यापेक्षा प्रश्न भोगणाऱ्या लोकांना त्याचं कधीच काही वाटत नाही. कारण , वारकरी-भक्तजन विठ्ठलाचे वीर असतात. ' आम्ही विठ्ठलाचे वीर , फोडू कळीकाळाचेही शीर... ' असे हे निर्भयपणे संकटांवर मात करणारे वारीकर. पंढरपूर- विठ्ठल- वारी- भक्ती- आषाढी- कार्तिकी- भजन- कीर्तन- टाळमृदंगांच्या तालावर ' जयजय रामकृष्ण हरिऽऽ पुंडलिक वरदेऽऽ हरि विठ्ठलऽऽ ज्ञानदेवऽऽ तुकाऽऽराम... ' गजरात आमचे वारीकर संसाराच्या चिंता विसरून , मुक्ती मोक्ष प्राप्तीचा अलौकिक आनंद , याचि जगी याचि देही याचि डोळा साक्षात अनुभवतात. आनंदाचे डोही आनंद तरंग , आनंदचि अंग आनंदाचे करून , सावळ्या परब्रह्माच्या दर्शनानं पावन होतात. हे सर्व गेल्या हजार वर्षांपासून तरी महाराष्ट्रातल्या पंढरपुरात आषाढी-कार्तिकी एकादशीला घडत आलं आहे... 

Maharashtra Times 5 june  2012